विटनेस ली यांच्याविषयी

विटनेस ली, त्यांचे सेवाकार्य, लिखाण आणि विश्वास याविषयी जाणून घ्या.

विटनेस ली हे वॉचमन नी यांचे सर्वात जवळचे आणि सर्वात विश्वासू असे सहकामकरी होते. 1925 साली, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी, त्यांनी स्फोटक आत्मिक पुनर्जनितीकरणाचा अनुभव घेतला आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी स्वतःस त्याला समर्पित केले. तेव्हा पासून पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या ख्रिस्ती जीवनाच्या पहिल्या सात वर्षांमध्ये प्लेमाऊथ ब्रदरन पंथाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. नंतर त्यांची भेट वॉचमन नी यांच्याशी झाली, आणि त्यानंतरची पुढील 17 वर्षे, 1949 पर्यंत, ते चीनमध्ये बंधू नी यांचे सहकामकरी होते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जेव्हा जपानने चीनचा ताबा घेतला, प्रभूसाठीच्या विश्वासू सेवेबद्दल जपानींनी त्यांना तुरुंगात टाकले आणि छळ केला. देवाच्या या दोन सेवकांद्वारे झालेली सेवा आणि कार्याद्वारे चीनमधील ख्रिस्ती लोकांमध्ये मोठे संजीवन आणले गेले, ज्याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशात सुवार्तेचा मोठ्या प्रमाणावरील प्रसार आणि शेकडो मंडळ्यांची बांधणी झाली.

1949 मध्ये वॉचमन नी यांनी चीनमध्ये सेवा करणाऱ्या त्यांच्या सर्व सहकामकऱ्यांना एकत्र बोलावले आणि विटनेस ली यांना चीनच्या मुख्य भूमीच्या बाहेर, तैवानच्या बेटावर राहून सेवाकार्य पुढे चालवण्यास सांगीतले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, देवाच्या आशीर्वादाने तैवान आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये, शंभरहून अधिक मंडळ्यांची स्थापना झाली.

1960 च्या सुरुवातीला, प्रभूच्या मार्गदर्शनानुसार, विटनेस ली अमेरिकेला स्थलांतरीत झाले, जेथे प्रभूच्या लेकरांच्या फायद्यासाठी त्यांनी 35 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा आणि काम केले. ते 1974 पासून जून 1997 मध्ये प्रभूकडे जाईपर्यंत, कॅलिफोर्निया राज्यातील अनाहेईम शहरामध्ये वास्तव्य करून होते. अमेरिकेतील त्यांच्या सेवा कार्याच्या काळात त्यांनी 300 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली.

ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या अधिक खोल ज्ञानाची आणि अनुभवाची अभिलाषा बाळगणाऱ्या शोधक ख्रिस्ती लोकांसाठी विटनेस ली यांचे सेवाकार्य विशेष सहाय्यभूत ठरले आहे. संपूर्ण शास्त्रलेखातील दैवी प्रकटीकरण उघड करण्याद्वारे बंधू ली यांचे सेवाकार्य, मंडळी जी त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याची पूर्णता आहे त्या मंडळीच्या बांधणीकरता ख्रिस्ताला कसे जाणावे हे प्रकट करते. सर्व विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या शरीराच्या बांधणीच्या ह्या सेवेमध्ये सहभागी झाले पाहिजे जेणेकरुन शरीर स्वतःला प्रीतिमध्ये बांधू शकेल. या बांधणीचे काम तडीस जाण्याद्वारेच फक्त प्रभूचा उद्देश पूर्ण होऊ शकतो आणि त्याच्या हृदयाला समाधान मिळू शकते.

वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्या मुख्य विश्वासाचे वर्णन थोडक्यात पुढे दिले आहेः

  • पवित्र शास्त्र हे पूर्णपणे दैवी प्रकटीकरण, दोषातीत आणि देव-उच्छ्वासित, पवित्र आत्म्याद्वारे बोलण्याने प्रेरित असे आहे.
  • देव हा एकमेव एक त्रिएक देव–पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा–अनादीकालापासून अनंतकालापर्यंत समानतेने एकाच वेळी अस्तित्वात आणि परस्परे अंतर्निविष्ट (एक द्रव्य म्हणून एकत्र अस्तित्वात) आहे. देवाचा पुत्र, अगदी देव स्वतः, येशू ह्या नावाने मानव असण्यासाठी देहधारी झाला, कुमारी मरीयेपासून जन्मास आला, जेणेकरुन तो आमचा उद्धारकर्ता आणि तारक असू शकेल.
  • येशू, अस्सल मानव, मानवांना देव जो पिता ज्ञात करून देण्यासाठी पृथ्वीवर साडे तेहत्तीस वर्षे जगला.
  • येशू, देवाच्या पवित्र आत्म्याने देवाद्वारे अभिषिक्त केलेला ख्रिस्त, आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि आमचा उद्धार तडीस नेण्यासाठी त्याने त्याचे रक्त सांडले.
  • येशू ख्रिस्त, तीन दिवस पुरला गेल्यानंतर, मरणातून उठवला गेला, आणि चाळीस दिवसानंतर तो स्वर्गी आरोहित झाला, जेथे देवाने त्याला सर्वांचा प्रभू केले.
  • ख्रिस्ताने त्याच्या आरोहणानंतर त्याच्या निवडलेल्या अवयवांचा एका शरीरामध्ये बाप्तिस्मा करण्यासाठी देवाचा आत्मा ओतला. आज हा आत्मा पाप्यांना दोषी ठरवण्यासाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये दैवी जीवन भरण्याद्वारे त्यांना पुनर्जनित करण्यासाठी, ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांची जीवनात वाढ होण्याकरता त्यांच्यामध्ये वास करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या पूर्ण ओळखीकरता ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करण्यासाठी पृथ्वीवर काम करत आहे.
  • ह्या युगाच्या समाप्तीस ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्याकरता, जगाचा न्याय करण्याकरता, पृथ्वीचा ताबा घेण्याकरता, आणि त्याचे सनातन राज्य स्थापित करण्याकरता येईल. आनंदपर्वात विजयशाली पवित्रजन ख्रिस्तासह राज्य करतील आणि ख्रिस्तातील सर्व विश्वासी सनातन काळाकरता नविन आकाश आणि नविन पृथ्वीतील नव्या यरुशलेमेत दैवी आशीर्वादात सहभागी होतील.

आमची मोफत ख्रिस्ती पुस्तके.

इ-पुस्तक किंवा छापिल पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध

आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.

अधिक जाणा

इतरांसह वाटून घ्या