गुप्तता धोरण

ही वेबसाइट वापरत असताना तुम्ही पुरवलेल्या माहितीचा रेमा साहित्य वितरक कसा उपयोग करतील आणि सुरक्षीत राखतील या संबंधी हे गुप्तता धोरण माहिती देईल. लक्षात घ्या की हे धोरण बदलु शकते, त्यामुळे केलेल्या बदलांबाबत तुम्ही समाधानी आहा याची खात्री करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी हे पान पडताळू शकता. हे धोरण, १ जानेवारी २०११ पासून लागू आहे.

आम्ही काय जमा करतो

तुमचा या वेबसाइटचा वापर अधिक सुरळीत करण्यासाठी आणि मोफत पुस्तकांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पुढील गोष्टी जमा केल्या जातील: भाषेची निवड, नाव आणि देशासह पत्रव्यवहाराचा पत्ता, आणि वैध ई-मेल पत्ता.

आम्ही कसे रक्षण करतो

तुमची माहिती सुरक्षित आहे याची हमी देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आम्ही ऑनलाईन गोळा केलेल्या माहितीचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्राकृतिक, इलेक्ट्रॉनिक आणि व्यवस्थापकिय प्रक्रिया लागू केल्या आहेत. अंमलात असलेल्या कायद्यामुळे मागणी केली गेल्याशिवाय आम्ही तुमची व्यक्तीगत माहिती तिसऱ्या पक्षाला कोणत्याही परिस्थितीत विकणार नाही, वाटणार नाही किंवा भाडेकरारावर देणार नाही.

तुम्ही कसा प्रतिसाद द्याल

आमच्याकडे असलेल्या तुमच्या व्यक्तिगत माहितीसंबंधीच्या तपशीलाची तुम्ही आमच्याकडे मागणी करू शकता. जर तुमची खात्री असेल की काही माहिती चूकीची आहे किंवा तुमच्या संमतीशिवाय दिली गेली आहे, तर ही समस्या दुरुस्त करण्याकरता कृपया आमच्याशी संपर्क साधा. पुस्तकांची मागणी करण्याकरता जर तुम्ही तुमची माहिती पूर्वी सादर केली होती, तर कालांतराने आमच्या नोंदणीतून तुमची ती माहिती काढून टाकण्याची तुम्ही विनंती करू शकता.

आम्ही कुकीज् कशा वापरतो

कुकी ही छोटी फाईल असते जी विशिष्ट साइटविषयीच्या पसंती लक्षात ठेवण्यासाठी वेबसाइट वापरू शकतात. आम्ही कुकींचा उपयोग फक्त तुमच्या भाषेची निवड लक्षात ठेवण्यासाठीच करतो. तुमची विशेष ओळख ध्यानात ठेवण्यासाठी कुकी काहिही साठवून ठेवणार नाही.

ही योजना कोठे लागू होते

आमच्या वेबसाइटवर इतर आवडीच्या ठिकाणांशी जोडणाऱ्या लिंकस् असू शकतील. या लिंकस् निवडून, तुम्ही परिणामकारकरितीने ही साइट सोडू शकाल आणि आमच्या गुप्ततेच्या धोरणा खाली येऊ शकणार नाही. वेबसाइटला लागू होणारे गुप्ततेचे धोरण पडताळून पाहण्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी.