वापरण्याच्या अटी

रेमा साहित्य वितरकांच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे. या साइटचा वापर करून

तुम्ही खालील वापराच्या अटी मान्य असल्याचे दर्शवता. या अटींबाबत आपल्याला काही प्रश्न असल्यास, संपर्कासाठी दिलेल्या पानावरील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधण्यास आम्ही तुमचे स्वागत करतो.

समाविष्ट बाबी

या वेबसाइटच्या पानावरील अंतर्भूत गोष्टी फक्त तुमच्या सामान्य माहितीकरता आणि वापराकरता आहे. कोणतीहि पूर्व सूचना न देता तिच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. कोणत्याहि विवक्षीत उद्देशाने या वेबसाइटवर आढळणाऱ्या किंवा देऊ केलेल्या माहितीच्या आणि सामग्रीच्या अचूकतेची, वक्तशीरपणाची, कामाची, पूर्णतेची किंवा उपयुक्ततेची खात्री किंवा हमी आम्ही किंवा कोणताही तिसरा पक्ष देत नाही. तुम्ही मान्य करता की अशा माहिती आणि सामग्रीमध्ये दोष किंवा चुका असू शकतात आणि आम्ही, कायद्याने दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, स्पष्टपणे अशा कोणत्याही दोषांची किंवा चुकांची जोखीम नाकारतो.

लेआऊट

आम्ही ही साइट 1024x768 मॉनिटर डिस्प्ले करता तयार केली आहे. या व्यतिरीक्त, ही साइट इतर ब्रॉऊझर्स सोबत चांगले काम देत असता, आम्ही मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोरर 8.0 करता या साइटची कार्यक्षमता जास्तातजास्त परिणामकारक केली आहे.

मागणी आणि गुप्तता

गुप्ततेबाबतच्या पूर्ण अटी स्वतंत्रपणे पोस्ट केलेल्या गुप्तते संदर्भातील निवेदनामध्ये दिल्या आहेत. थोडक्यात, मोफत साहित्याकरता केलेल्या विनंती संदर्भातील प्रक्रीया पूर्ण करण्याकरता आणि ते सुस्थितीत प्राप्त होईल हे निश्चित करण्याकरताच तुमच्या व्यक्तिगत माहितीची आवश्यकता आहे. मागण्यांची पूर्तता उपलब्धतेवर आणि टपाला संदर्भातील सुयोग्य माहितीच्या आधारावर केली जाते. विशिष्ट बाबीत, खर्च, कायद्याचे निर्बंध, आंतरराष्ट्रीय मतभेद, आयात नियम, आणि इतर घटकांमुळे विशिष्ट ठिकाणांहून आलेल्या मागण्यांची पूर्तता करता येत नाही. हे घटक कोणत्यही सूचनेशिवाय बदलू शकतात.

कॉपीराइट

रेमा साहित्य वितरकांच्या मालकिची किंवा सनद मिळालेली पुस्तके या वेबसाइटवर समाविष्ट आहेत. या सामग्रीमध्ये आकृत्या, छापिल मजकूर आणि वाखाणणीच्या टिपणांसह आराखडा, मांडणी, स्वरूप, आकार आणि चित्रालेख समाविष्ट आहेत, पण आराखडा, मांडणी, स्वरूप, आकार आणि चित्रालेख याबाबत मर्यादित नाहीत. प्रामाणिक वापराच्या तरतुदींव्यतीरिक्त इतर सर्व प्रकारच्या पुनरुत्पादनाला मनाई आहे. या वेबसाइटचा अनधिकृत वापर केल्यास नुकसान भरपाई आणि/किंवा फौजदारी गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

जोखीम

ह्या वेबसाइटवरील कोणत्याही माहितीचा किंवा सामग्रीचा तुम्ही करत असलेला उपयोग हा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आहे, ज्याकरता रेमा साहित्य वितरक किंवा त्याचे प्रतिनिधी जबाबदार असणार नाहीत. ह्या वेबसाइटकरवी उपलब्ध असलेली कोणतीही उत्पादने, सेवा किंवा माहिती तुमच्या विशिष्ट गरजांची पूर्ती करते याची खात्री करणे ही तुमची स्वतःची जबाबदारी असेल. वेळोवेळी ही वेबसाइट इतर वेबसाइटसच्या लिंकस् देखील समाविष्ट करेल. तुम्हास आणखी माहिती पुरवण्यासाठी तुमच्या सोईकरता पुरवण्यात आल्या आहेत. जोडण्यात आलेल्या वेबसाइट(स)च्या अंतर्भूत गोष्टींकरता आम्हावर काही जबाबदारी नाही. ह्या वेबसाइटचा तुम्ही करत असलेला उपयोग आणि वेबसाइटच्या अशा उपयोगातून निर्माण झालेला कोणताही वाद स्टेटस् ऑफ वॉशिंग्टन आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका यांच्या नियमाधिन आहे.