जेव्हा केव्हा नैसर्गिक आपत्ती, जशा की, सर्वत्र पसरलेला साथीचा रोग, भूकंप, वादळ/चक्रीवादळ, पूर इ., येतात, तेव्हा लोक स्वत:ला विचारतात की जगाचा अंत कधी होईल. हा गंभीर प्रश्न आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. काही लोक हा प्रश्न विचारतात कारण ते मरणाला घाबरत असतात. इतर लोक न्यायाच्या दिवसाला घाबरत असतात, तरी इतर आशा करत असतात की आम्ही ज्यामध्ये आहोत त्या कुरूप गोंधळाचा देव त्वरेने अंत करेल आणि त्याचे प्रीतीचे आणि नितीमत्वाचे राज्य आणेल जेणेकरून मानव शांतीत आणि आनंदात राहिल.