सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली शांती मला कशी प्राप्त होऊ शकेल?

सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली शांती मला कशी प्राप्त होऊ शकेल?

आमच्यापैकी अनेकजण विचार करतात की, शांती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आमचे बाहेरील पर्यावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. तथापि, प्रत्यक्षात आम्हीच बाहेरच्या पर्यावरणाने नियंत्रित केले जात असतो. आमचे बाहेरील पर्यावरण शांतीपूर्ण बनण्याची आम्ही आशा करतो, परंतु त्याऐवजी, आमचे जीवनच सातत्याने शांतीचा शोध करण्याचा आणि ती राखण्याच्या प्रयत्नात असते. दुसऱ्या बाजूला, पवित्र शास्त्र (बायबल) जगण्याचा एक संपूर्णपणे निराळाच मार्ग प्रकट करते; तेच हे जीवन आहे जे आमच्या पर्यावरणाची पर्वा न करता उच्च, सखोल, चिरस्थायी, आणि श्रेष्ठ शांती आणते.

आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील – फिलिप्पै. ४:७.

प्रथम, केवळ मनुष्याच्या शांतीपेक्षा उच्च असलेले असे काहीतरी आम्ही पाहतो – देवाची स्वतःची शांती प्रत्येकासाठी उपलब्ध आहे! मनुष्य जी शांती निर्माण करतो ती मर्यादित आहे, परंतु, देवाची शांती अमर्याद, आमच्या बुद्धीच्या आणि जाणीवांच्या पलीकडे आहे. आम्ही गोंधळाच्या, तणावपूर्ण अशा बाह्य परिस्थितींमधून जात असताना, देवाच्या शांतीच्या माध्यमातून आम्हाला शांतीची आतील जाणीव लाभू शकेल. ही शांती आमची हृदये आणि विचार राखण्यास देखील समर्थ आहे. देवाची शांती जेव्हा आम्हाला लाभते तेव्हा आम्ही निराश, गर्भगळीत, किंवा चिंताक्रांत होत नाही.

मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो; जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण घाबरू नये व भिऊही नये – योहान. १४:२७.

ख्रिस्ती मनुष्य अशक्त असेल, तरीही बलवान असल्याचे त्याला जाणवेल; त्याला वेदना जाणवेल, तरीही शांतीची भावना जाणवेल. त्याला वेदना जाणवते कारण तो बाहेरून येणाऱ्या संकटांना तोंड देतो; त्याला शांतीची भावना जाणवते कारण त्याची प्रभूसोबत गाठ पडते आणि तो आतमधून प्रभूला स्पर्श करतो.
जीवनाचे ज्ञान, पान ५५*

दुसरे, देवाची शांती आम्ही कशी अनुभवू शकतो ते आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगितले आहे. देव आम्हाला शांती या नात्याने एक वस्तू देत नाही, तर तो आम्हाला एक मनुष्य देतो – तो स्वतः ख्रिस्त आम्हाला शांती म्हणून देतो. आम्ही शांती प्राप्त करण्याकरता आमच्या आतमध्ये ख्रिस्ताला स्पर्श करायला हवा. हा शांतीचा अनुभव आमच्या मानवी आत्म्यामध्ये सुरू होतो. देवाने मनुष्याला आत्म्यासह निर्माण केले आहे, परंतु मनुष्याच्या पतनामुळे, आमचा आत्मा मृतवत बनला आणि निष्क्रिय झाला. देवाची शांती प्राप्त करण्याकरता आम्हाला प्रथम आमचा आत्मा संजीवीत केला जाण्याची गरज आहे.

रोमकरास पत्र अध्याय ८ मधील वचन ६ मध्ये प्रेषित म्हणतो, “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” याचा अर्थ असा की, आत्म्यावर आमचे मन लावण्याचा परिणाम केवळ जीवनच नाही, तर शांती देखील आहे. त्यामुळे, जीवन हे आत्म्याचे फळ आहे, आणि शांती देखील आत्म्याचेच फळ आहे. आम्ही जेव्हा आत्म्याला स्पर्श करतो, तेव्हा आम्ही जीवनाला स्पर्श करतो आणि त्याप्रमाणेच आम्ही शांतीला देखील स्पर्श करतो.
जीवनाचे ज्ञान, पान ६४*

तिसरे, आमचे मन हे आमच्या जीवाचा मुख्य भाग आहे – म्हणून ज्यावर आमचे मन लागलेले असते, त्यालाच आमचे संपूर्ण व्यक्तीत्व अनुसरते. आमचे मन जर पूर्णपणे आमच्या सभोवती घडणाऱ्या घटनांवर लागलेले असेल, तर आम्ही देवाची शांती अनुभवू शकणार नाही. आम्ही आतमधून जिवंत आणि शांतीपूर्ण असण्या ऐवजी मेलेले असू. आम्ही आमचे मन आमच्या आत्म्यावर लावण्यास आणि आमच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला स्पर्श करण्यास शिकले पाहिजे.

आम्ही जर आमच्यामध्ये पुरेसा देव मिळवून घेतलेला असेल आणि देवाला आणि देवाच्या जीवनाला पुरेशा प्रमाणात अनुभवले असेल, तर आम्हाला आमच्या आतमध्ये पुरेशी शांती लाभेल. ही शांती पर्यावरणातील शांती नसेल, तर आमच्या आतमध्ये असलेली शंतीची स्थिती असेल.
जीवनाचे ज्ञान, पान ५०-५१*

चौथे, आम्ही घेतलेला देवाचा, देवाच्या जीवनाचा, आणि शांतीचा अनुभव, हे सर्व एकत्रच जातात. देवाला मिळवून घेण्याचा अनुभव शांतीमध्ये परिणत होतो. ही शांतीची आंतरीक जाणीव, आमच्या बाह्य पर्यावरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कोणत्याही शांतीपेक्षा आधिक सखोल आहे.

तुम्ही जर तुमच्या बुद्धीच्या पलीकडे जाणाऱ्या शांतीचा शोध घेत असाल आणि शांतीच्या देवाला अद्याप स्वीकारले नसेल, तर खुल्या अंतःकरणाने त्याला सांगा :

“प्रभू येशू, मला तुझी गरज आहे. प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्यामध्ये ये! तुझे जीवन मला आत्ताच दे. तुझ्या शांतीने मला भरून टाक. प्रभू, माझे जीवन आणि खरी सुरक्षितता बनल्याबद्दल, मी तुझे आभार मानतो. मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रभू!”

संकट आणि त्रासातून सुटका मिळवण्याकरता प्रभूच्या नावाचा धावा करणे” हा प्रात्यक्षिकपणे शांती प्राप्त करण्याचा मार्ग दाखवणारा आमचा यानंतरचा लेख तुम्ही पुढे वाचू शकता.

*All quotes and verses Copyright © by Living Stream Ministry. Verses taken from "The New Testament Recovery Version Online" at https://online.recoveryversion.bible


इतरांसह वाटून घ्या