क्लेशातून आणि त्रासातून सुटका मिळवण्याकरता प्रभूच्या नावाचा धावा करणे

क्लेशातून आणि त्रासातून सुटका मिळवण्याकरता प्रभूच्या नावाचा धावा करणे

क्लेशाच्या आणि त्रासाच्या परिस्थितींमध्ये कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत, लोक पुष्कळदा फारच गोंधळलेले किंवा अस्पष्ट असतात. अनेकजण अशा समयी प्रार्थनेकडे वळतात, परंतु, आम्ही कशासाठी प्रार्थना करायची, आणि आम्ही कशी प्रार्थना करायची? एक अगदी साधा आणि सहज उपयोगी पडणारा मार्ग म्हणजे, पवित्र शास्त्रामध्ये (बायबलमध्ये) नमूद केल्याप्रमाणे प्रभूच्या नावाचा धावा करणे (रोम. 10:13). धावा करणे ही विशिष्ट प्रकारची प्रार्थनाच आहे; ती केवळ एक विनंती किंवा संभाषण नाही, तर आत्मिक श्वसनाचा सराव आहे, जो आम्हाला जिवंत बनवतो आणि आमचे आत्मिक सामर्थ्य टिकवून ठेवतो.

“हे यहोवा, मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला आहे. तू माझा शब्द ऐकला आहे, माझ्या उसाशाकडे, माझ्या आरोळीकडे तू आपला कान बंद करू नको” – विलाप. ३:५५-५६

वरील वचनामध्ये, यिर्मया म्हणतो की, प्रभूच्या (यहोवाच्या) नावाचा धावा करणे म्हणजे त्याला आरोळी मारणे आणि आत्मिक हवेचे श्वसन करणे होय. प्रभूच्या नावाचा अशारीतीने धावाकरणे आम्हाला आंतरीकरीतीने आमच्या संकटातून आणि त्रासातून तात्काळ सुटका देते.

स्तोत्र ११८:५ मध्ये स्तोत्रकर्ता साक्ष देतो की, “संकटातून मी यहोवाला आरोळी केली तेव्हा यहोवाने मला उत्तर दिले, व प्रशस्त स्थानात ठेवले.” स्तोत्र ५०:१५ मध्ये देखील, आम्ही वाचतो, “आणि संकटाच्या दिवशी मला हाक मार; मी तुला मुक्त करीन, आणि तू माझे गौरव करशील.” संकट आणि त्रासापासून सुटका अनुभवण्याचा मार्ग म्हणून धावा करण्यावर ही वचने भर देतात.

“प्रभूच्या नावाचा धावा करण्याचे आणखी एक कारण म्हणजे क्लेशापासून (स्तोत्र. १८:६; ११८:५), त्रासापासून (स्तोत्र. ५०:१५; ८६:७; ८१:७), आणि दुःख व वेदनेपासून (स्तोत्र. ११६:३-४) वाचवले जाणे. जे लोक प्रभूच्या नावाचा धावा करण्याच्या विरोधात वाद घालत होते, ते जेव्हा स्वतः एखाद्या त्रासामध्ये किंवा आजारामध्ये अडकले तेव्हा तेच प्रभूच्या नावाचा धावा करत असताना दिसले. आमचे जीवन जेव्हा त्रासापासून मुक्त असते, तेव्हा कदाचित आम्ही प्रभूच्या नावाने धावा करण्याविरुद्ध वाद घालू. तथापि, जेव्हा संकट येते, तेव्हा कोणीही आम्हाला त्याचा धावा करण्याविषयी सांगण्याची गरज पडत नाही; आपोआपच आम्ही धावा करू लागू.”
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्त्वे, भाग १, पान. ३४*

प्रभूच्या नावाचा धावा करणे हे काही नवीन नाही. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही ते पाहतो (उत्प. ४:२६; उत्प. १२:८; प्रेषित. २२:१६; २ तीमथ्य. २:२२). परंतु, मागील शतकांमध्ये ही सवय नाहीशी झाली आणि इतकेच नाही तर काहींच्याकडून तिच्यासंबंधी गैरसमजही करून दिला गेला. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये ते इतके सर्वसाधारण होते, की, प्रभूच्या नावाचा धावा करण्याच्या त्यांच्या सवयींमुळे ते सहज ओळखले जात असत (प्रेषित. ९:१४, २१). आम्ही क्लेशाच्या आणि त्रासाच्या समयातून जात असू किंवा नसू, आम्ही सर्व ठिकाणी आणि सर्व परिस्थितीमध्ये प्रभूच्या नावाचा धावा करण्याचा सराव करू शकतो (१ करिंथ. १:२).

प्रेषित. २:२१ म्हणते, “तेव्हा असे होईल की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील तो तारला जाईल.”

आम्हाला जर आताच तारण पावायचे असेल, तर प्रभू येशूच्या नावाचा धावा करा आणि त्याला सांगा :

“प्रभू येशू! हे प्रभू येशू! प्रभू येशू! तुझ्या नावाचा धावा करणे माझ्या करता इतके सोपे करून दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. माझी वाणी ऐकल्याबद्दल तुझे आभार मानतो. तू ये आणि माझे तारण कर. तुझ्यासाठी मी स्वतःला खुले करतो. मी तुझ्या नावाचा धावा करतो. हे प्रभू येशू! मी तुझ्यावर प्रेम करतो.”

पुढे जाऊन, रोमकरास पत्र १०:१२ मध्ये आम्ही पाहतो की, येशू सर्वांचा प्रभू आहे आणि जे कोणी त्याच्या नावाचा धावा करतात त्या सर्वांकरता समृद्ध आहे. प्रभूच्या नावाचा धावा करण्या द्वारे, तो किती समृद्ध आहे ते आम्ही सतत आनुभवू शकतो. धावा करणे हा, आमच्या भौतिक(शारीरिक) श्वासोच्छ्वासाप्रमाणेच, प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या देवाची समृद्धी आनुभवण्याचा मार्ग आहे.

प्रभूच्या नावाचा धावा करण्याबद्दल तुम्ही, ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, भाग १, या पुस्तिकेतील “प्रभूच्या नावाचा धावा करणे” या प्रकरणामध्ये वाचू शकता. तुमच्या मोफत प्रतीची आजच मागणी करा.

*All quotes © by Living Stream Ministry. Verses taken from "The New Testament Recovery Version Online" at https://online.recoveryversion.bible


इतरांसह वाटून घ्या