देव, मानव आणि पृथ्वीवर काय घडत आहे या विषयींचे प्रश्न

जगभर साथीचा रोग पसरलेल्या स्थितीत असता या दिवसात आध्यात्मिक चिंता आणि प्रश्न या विषयी आम्ही पवित्र शास्त्रामधून काही समजून घेण्याच्या गोष्टी तुम्हासह विभागून घेऊ इच्छितो, जशा की : देव काय करत आहे? मी काय करावे? या सर्व गोष्टी का घडत आहेत? भविष्यात काय वाढून ठेवले आहे? आम्ही आशा बाळगतो की ह्या अभूतपूर्व स्थितीमध्ये तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांनी कसे वागावे हे जाणण्याचा शोध घेण्यात ह्या गोष्टी साह्यभूत होईल.

लेख

शांती आणि सुरक्षितपणा

आम्हांला शांती व सुरक्षितपणा प्रदान करण्याच्या हेतूनेच मानवी समाजाची रचना करण्यात आली आहे. शांती व सुरक्षिततेशिवाय आपले जीवन भीती आणि संशयात व्यतीत होते. आमची सरकार आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे; आमची रुग्णालये आणि दवाखाने आपले आरोग्य व शारीरिक कल्याण जपण्याचा प्रयत्न करतात, आमच्या बँका आणि इतर वित्तीय संस्था आमच्या बचती आणि गुंतवणूकीसाठी सुरक्षिततेचे आश्वासन देतात. परंतु शेवटी, आपण आपल्या वित्तीय संस्था, आपले सरकार, आपली आरोग्य सेवा प्रणाली आणि ज्यावर आपण अवलंबून आहोत अशा बर्‍याच गोष्टींमध्ये दिलेल्या सुरक्षिततेवर खरोखर किती अवलंबून आहे?


इतरांसह वाटून घ्या