ख्रिस्ती लेखक, वॉचमन नी यांच्याविषयी

वॉचमन नी, त्यांचे सेवाकार्य, लिखाण आणि विश्वास याविषयी जाणून घ्या.

आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की, वॉचमन नी आणि त्यांचे सहकामकरी विटनेस ली यांच्या द्वारे झालेले ख्रिस्ताच्या शरीरासाठीचे सेवाकार्य पृथ्वीवरच्या सर्व खंडांमध्ये असलेल्या प्रभूच्या लोकांकरता सुमारे 80 वर्षांपेक्षा जास्त काळ आशीर्वादाचे ठरले आहे. त्यांचे लिखाण अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्याविषयी आमचे वाचक आम्हाला खूप प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर म्हणून आम्ही या दोन बंधूंच्या जीवनाचा आणि कार्याचा संक्षिप्त आलेख सादर करत आहोत.

या दोन बंधूंच्या सेवाकार्याचे मुख्य गुणविशेष हे आहेत की त्या दोघांनीही पवित्र शास्त्राच्या शुध्द वचनानुसार सत्य शिकवले.

वॉचमन नी यांच्याविषयी

वॉचमन नी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यांच्याद्वारे झालेले सेवाकार्य संपूर्ण जगभरातील शोधक विश्वासणाऱ्यांमध्ये सुपरिचित आहे. त्यांच्या लिखाणातून अनेकांना आत्मिक जीवन आणि ख्रिस्त आणि त्याचे विश्वासणारे यांच्या दरम्यानच्या नातेसंबंधाविषयी सहाय्य मिळाले आहे. तथापी, त्यांच्या सेवाकार्याचा तितकाच महत्वाचा पैलू जो मंडळी जीवनाचा आचार आणि ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी यावर भर देतो तो अनेक लोकांना माहिती नाही. बंधू नी यांनी, मंडळी जीवन आणि ख्रिस्ती जीवन या दोहोंसंबंधी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत बंधू वॉचमन नी हे देवाच्या वचनातील रहस्ये उलगडून सांगण्यासाठी प्रभूद्वारे मिळालेली देणगी असेच होते. चीनच्या मुख्य भूमीमध्ये प्रभूसाठी वीस वर्षे तुरुंगवास सोसल्यानंतर, 1972 साली येशू ख्रिस्ताचे विश्वासू साक्षी म्हणून ते मरण पावले.

वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्या मुख्य विश्वासाचे वर्णन थोडक्यात पुढे दिले आहेः

  • पवित्र शास्त्र हे पूर्णपणे दैवी प्रकटीकरण, दोषातीत आणि देव-उच्छ्वासित, पवित्र आत्म्याद्वारे बोलण्याने प्रेरित असे आहे.
  • देव हा एकमेव एक त्रिएक देव–पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा–अनादीकालापासून अनंतकालापर्यंत समानतेने एकाच वेळी अस्तित्वात आणि परस्परे अंतर्निविष्ट (एक द्रव्य म्हणून एकत्र अस्तित्वात) आहे. देवाचा पुत्र, अगदी देव स्वतः, येशू ह्या नावाने मानव असण्यासाठी देहधारी झाला, कुमारी मरीयेपासून जन्मास आला, जेणेकरुन तो आमचा उद्धारकर्ता आणि तारक असू शकेल.
  • येशू, अस्सल मानव, मानवांना देव जो पिता ज्ञात करून देण्यासाठी पृथ्वीवर साडे तेहत्तीस वर्षे जगला.
  • येशू, देवाच्या पवित्र आत्म्याने देवाद्वारे अभिषिक्त केलेला ख्रिस्त, आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि आमचा उद्धार तडीस नेण्यासाठी त्याने त्याचे रक्त सांडले.
  • येशू ख्रिस्त, तीन दिवस पुरला गेल्यानंतर, मरणातून उठवला गेला, आणि चाळीस दिवसानंतर तो स्वर्गी आरोहित झाला, जेथे देवाने त्याला सर्वांचा प्रभू केले.
  • ख्रिस्ताने त्याच्या आरोहणानंतर त्याच्या निवडलेल्या अवयवांचा एका शरीरामध्ये बाप्तिस्मा करण्यासाठी देवाचा आत्मा ओतला. आज हा आत्मा पाप्यांना दोषी ठरवण्यासाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये दैवी जीवन भरण्याद्वारे त्यांना पुनर्जनित करण्यासाठी, ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांची जीवनात वाढ होण्याकरता त्यांच्यामध्ये वास करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या पूर्ण ओळखीकरता ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करण्यासाठी पृथ्वीवर काम करत आहे.
  • ह्या युगाच्या समाप्तीस ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्याकरता, जगाचा न्याय करण्याकरता, पृथ्वीचा ताबा घेण्याकरता, आणि त्याचे सनातन राज्य स्थापित करण्याकरता येईल. आनंदपर्वात विजयशाली पवित्रजन ख्रिस्तासह राज्य करतील आणि ख्रिस्तातील सर्व विश्वासी सनातन काळाकरता नविन आकाश आणि नविन पृथ्वीतील नव्या यरुशलेमेत दैवी आशीर्वादात सहभागी होतील.

आमची मोफत ख्रिस्ती पुस्तके.

इ-पुस्तक किंवा छापिल पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध

आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.

अधिक जाणा

इतरांसह वाटून घ्या