आमची पुस्तके तुम्हाला पवित्र शास्त्र समजून घेण्यास मदत करतील

पवित्र शास्त्राची तुमची समज विस्तारीत करा आणि देवाच्या वचनाद्वारे पोषण प्राप्त केलेले व्हा.

यथोचित क्रमाने आमच्या पुस्तकांतून वाचण्याद्वारे तुम्ही पवित्रशास्त्र आणि त्यातील मुख्य मुद्यांविषयी शिकाल. आमच्या पुस्तकांचे वाचन हे पवित्रशास्त्राच्या वाचनाकरता पुरवणी असे आहे, आणि मूलभूत ख्रिस्ती विश्वासाच्या सर्व मुद्यांविषयीची तुमची समज सुधारण्यास मदत करु शकते. आमच्या पुस्तकांची मदत तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता उत्तम पाया पुरविते.

पवित्र शास्त्रातील अनेक मध्यवर्ती मुद्दे तपशीलवार मार्गाने स्पष्ट करण्यात आले आहेत, जसेः ख्रिस्त, मंडळी, देवाचे जीवन, आणि देवाचे आजचे काम. पवित्र शास्त्रातील अनेक कथा, दाखले, चिन्हे, नमुने, आणि प्रतीके यांचे अर्थबोध समाविष्ट आहेत जे तुम्हास पवित्र शास्त्र समजून घेण्यास मदत करतील.

आध्यात्मिक वाढीकरता पवित्र शास्त्र वाचा

जेव्हा आम्ही पवित्रशास्त्र वाचनाकडे येतो तेव्हा फक्त पवित्रशास्त्र समजून घेणे किंवा त्यातून ज्ञान प्राप्त करणे हीच आमची गरज नाही; आम्ही देवाच्या वचनाद्वारे आध्यात्मिकरित्या पोषिलेले आणि पुरवठा प्राप्त केलेले असण्याची गरज आहे – ही आमची प्राथमिक गरज आहे. अजूनही आम्हाला पवित्रशास्त्राच्या योग्य समजबुध्दीची आवश्यकता आहे, आणि आमची पुस्तके यासाठी मदत करतील, परंतु आम्ही ह्या पलिकडे जायला हवे आणि पवित्रशास्त्रात समाविष्ट असलेले आत्मा, जीवन आणि अन्न यांना देखील स्पर्श करण्यास शिकले पाहिजे.

पवित्र शास्त्र म्हणते की ते दूध आहे, अन्न आहे, मधाहून गोड आहे आणि की आम्ही वचने खावी. आम्ही हे कसे करु शकतो? हे भौतिक खाणे नाही, तर आध्यात्मिक खाणे आहे ज्याद्वारे आम्ही प्रगल्भतेप्रत वाढू शकू.

ग्रीकमध्ये वचनासाठी दोन शब्द आहेत - लोगोस आणि रेमा. लोगोस हे लिखीत, नित्य वचन आहे. रेमा हे तत्पर, सद्य बोलले गेलेले वचन आहे. पवित्र शास्त्रातील वचनांमध्ये आत्मा आणि जीवन समाविष्ट आहे, आणि ते रेमा वचन यानात्याने आम्हाकरता अन्न असू शकते. वचनातील आंतर्भूत आध्यात्मिक गोष्टी आम्ही प्राप्त कराव्या यासाठी पवित्र शास्त्रातील लिखित शब्द घेण्याचा आणि ते देवाचे आम्हाशी तत्पर बोलणे यामध्ये बदलण्याचा मार्ग आम्ही शिकण्याची गरज आहे. हे करण्याचा मार्ग आमच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे आणि तो मार्ग तुम्ही पवित्र शास्त्र वाचत असता तुमचा अनुभव समृद्ध करेल. ह्या पुस्तकांद्वारे आम्हास खूप मदत प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच आम्ही स्वतःला रेमा साहित्य वितरक म्हणवून घेण्याचा निर्णय घेतला.


पवित्र शास्त्राभ्यास साधने


इतरांसह वाटून घ्या